आधार आधारित प्रणाली शिष्यवृत्तीसाठी अनिवार्य; १५ एप्रिलपर्यंत आधार जोडण्यासाठी मुदत 
मुंबई

आधार आधारित प्रणाली शिष्यवृत्तीसाठी अनिवार्य; १५ एप्रिलपर्यंत आधार जोडण्यासाठी मुदत

शिष्यवृत्ती व फेलोशिपच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यासाठी आधार आधारित पेमेंट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना उच्च शिक्षण संस्थांना दिल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : शिष्यवृत्ती व फेलोशिपच्या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यासाठी आधार आधारित पेमेंट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना उच्च शिक्षण संस्थांना दिल्या आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. हा निर्णय २०२६-२७या शैक्षणिक वर्षासाठी लागू करण्यात आला आहे. यासाठी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणे लिंक करून त्याची माहिती एसएफएमपी प्रणालीवर अद्ययावत करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कम ही फक्त आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोडल अधिकाऱ्यांवर जबाबदारी

शैक्षणिक संस्थांमधील नोडल अधिकाऱ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आधार आधारित बैंक खात्याची पडताळणी करून त्यास मंजुरी देणे आवश्यक असून ही प्रक्रिया २० एप्रिलपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात शिष्यवृत्तीचे वितरण वेळेत करण्याचे नियोजन यूजीसीचे आहे.

मध्यस्थांची गरज कमी होणार

आधार आधारित पेमेंट प्रणालीमुळे निधी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असून मध्यस्थांची गरज कमी होईल. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसून प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित होईल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे. याशिवाय, आधार अद्ययावत करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक एसएफएमपी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली