मुंबई

क्यूएस क्रमवारीसाठी विद्यापीठांना आवाहन; यूजीसीची उच्च शिक्षण संस्थांना १२ एप्रिलपर्यंत मुदत

क्यूएस जागतिक क्रमवारीमध्ये देशातील अधिकाधिक उच्च शिक्षण संस्थांचा समावेश होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) प्रयत्नशील आहे. त्यानुसार क्यूएस जागतिक क्रमवारी २०२७ ची प्रक्रिया यूजीसीने सुरू केली आहे.

Swapnil S

मुंबई : क्यूएस जागतिक क्रमवारीमध्ये देशातील अधिकाधिक उच्च शिक्षण संस्थांचा समावेश होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) प्रयत्नशील आहे. त्यानुसार क्यूएस जागतिक क्रमवारी २०२७ ची प्रक्रिया यूजीसीने सुरू केली आहे. या क्रमवारीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उच्च शिक्षण संस्थांनी १२ एप्रिलपर्यंत क्यूएस हब पोर्टल या संकेतस्थळावर माहिती सादर करण्याच्या सूचना देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत.

जागतिक स्तरावर क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी प्रतिष्ठित मानली जाते. या संशोधन, पायाभूत सुविधा तसेच शाश्वतता संदर्भातील माहिती सादर करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे क्यूएस कंपनीने संस्थांची माहिती सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी १२ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी सर्व माहिती सादर करणे बंधनकारक आहे. क्रमवारीत प्रवेश मिळविण्यासाठी संस्थांनी आपली शैक्षणिक, देशातील पात्र व इच्छुक उच्च शिक्षण संस्थांनी आवश्यक संस्थात्मक माहिती 'क्यूएस हब पोर्टल' या ऑनलाइन संकेतस्थळावर सादर करावी लागणार आहे. माहिती सादर करताना अचूकता आणि वेळेचे पालन यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना शिक्षण मंत्रालयाने सर्व संबंधित संस्थांना केली आहे. वेळेत आणि अचूक माहिती सादर केल्यास जागतिक क्रमवारीमध्ये संस्थांना योग्य सहकार्य करण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा वाढविण्यासाठी आणि भारतीय उच्च शिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर अधिक दृश्यमानता मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. देशातील अधिकाधिक उच्च शिक्षण संस्थांनी क्यूएस क्रमवारीमध्ये स्थान मिळावे यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व संबंधित संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव मनीष जोशी यांनी केले आहे.

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा

ठाणे महापालिकेचा महसूल १,९०९ कोटींवर; करवसुलीत आघाडी कायम

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन