मुंबई

कोश्यारींनी अनेकदा घटनाविरोधी कामे केली; काय म्हणाले घटनातज्ज्ञ उल्हास बापट?

सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे ते सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या ठाकरे आणि शिंदे यांच्या सत्तासंघर्षावरील निकालाकडे

प्रतिनिधी

सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. अशामध्ये याबद्दल बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले की, "राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी अनेकदा घटनाविरोधी कृत्य केली आहेत" असा दावा त्यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक उदाहरणांचा दाखला दिला.

उल्हास बापट म्हणाले की, "सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत २ महत्त्वाच्या सुनावण्या सुरु आहेत. एक निवडणूक आयोगासमोर आणि दुसरी सर्वोच्च न्यायालयासमोर. माझ्यामते निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला फार महत्त्व नाही, कारण ती फक्त महाराष्ट्रपूर्ती मर्यादित असेल. पण, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीचा परिणाम हा देशभर पाहायला मिळणार आहे. कारण देशात सगळीकडे पक्षांतर हा मोठा मुद्दा आहे."

पुढे ते म्हणाले की, "राज्यपालांनी मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच वागायला हवे. त्यांना थोड्या फार प्रमाणात अधिकार असून ते अधिकार संविधानिक आहेत. पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अनेकदा घटनाविरोधी कृत्य केली आहेत. उदाहरणार्थ त्यांनी विधान परिषदेचे सदस्य नेमण्यास उशीर केला होता. तसेच कोणतीही चौकशी न करता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी केला. अशा अनेक चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या." असा खुलासा त्यांनी केला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल