ब्रिस्टल विद्यापीठाचा मुंबईत पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस; पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत, डेटा सायन्स, आर्ट्सचे अभ्यासक्रम 
मुंबई

ब्रिस्टल विद्यापीठाचा मुंबईत पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस; पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत, डेटा सायन्स, आर्ट्सचे अभ्यासक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत परदेशी विद्यापीठांकडून भारतात कॅम्पस सुरू करण्याचे प्रमाण वाढत असताना, ब्रिस्टल विद्यापीठाने मुंबईतील आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस औपचारिकरीत्या सुरू केला आहे.

प्रतिनिधी

श्रेया जाचक

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत परदेशी विद्यापीठांकडून भारतात कॅम्पस सुरू करण्याचे प्रमाण वाढत असताना, ब्रिस्टल विद्यापीठाने मुंबईतील आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस औपचारिकरीत्या सुरू केला आहे. विद्यापीठाने आपल्या पहिल्या विद्यार्थी तुकडीचेही स्वागत केले.

पवई येथे असलेल्या मुंबई एंटरप्राइज कॅम्पसमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. डेटा सायन्स, वित्त, वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) आणि इमर्सिव्ह आर्ट्स यांसारख्या क्षेत्रांवर अभ्यासक्रमांचा भर असेल. या ब्रिस्टल विद्यापीठाला यावर्षी जूनमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 'मान्यता पत्र' मिळाले. नामांकित परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्यास परवानगी देण्याच्या धोरणाचा हा भाग आहे.

ब्रिस्टल विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, हे अभ्यासक्रम ब्रिस्टलमधील विद्यापीठाच्या विद्यमान पदवी अभ्यासक्रमांवर आधारित असून, भारतीय संदर्भानुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

मुंबईतील कॅम्पसमध्ये संशोधन, उद्योग क्षेत्राशी संवाद आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणावरही भर दिला जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव यंदा साधेपणाने; नुकसानग्रस्त मूर्तीची लोखंडी संरचना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत

Mumbai : परवाना नूतनीकरणाचा हक्क नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, राज्य सरकारच्या भूमिकेवर ताशेरे

'वंदे भारत मालगाडी'ची १३० किमी वेगाने चाचणी

BRICS Summit 2026 : नवीन विमा व्यवस्थेचा व्लादिमीर पुतीन यांचा प्रस्ताव

पुण्याजवळ अपघातात २ ठार; १२ जखमी