मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी

प्रस्तावित उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Swapnil S

स्वीटी भागवत/मुंबई

प्रस्तावित उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विरारजवळील खार्डीमार्गे या प्रकल्पाला दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

या मंजुरीमुळे प्रस्तावित मुंबई-वाढवण एक्स्प्रेस-वे कॉरिडॉर आता देशाच्या राष्ट्रीय एक्स्प्रेस-वे नेटवर्कशी जोडला जाणार असून, त्याची धोरणात्मक भूमिका अधिक मजबूत होणार आहे. 'एमएमआरडीए' ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-वाढवण एक्स्प्रेस-वे कॉरिडॉर, वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जेएनपीटी-वाढवण पोर्ट लिंक मिळून १२० किलोमीटरचा पूर्णपणे नियंत्रण असलेला सागरी कॉरिडॉर तयार होणार आहे. हे नेटवर्क दक्षिण मुंबई ते वसई, विरार, पालघर आणि वाढवण बंदरापर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, तसेच या प्रदेशाला राष्ट्रीय एक्स्प्रेस-वे प्रणालीशी जोडेल.

महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली असून, भारतातील प्रमुख खोल समुद्रातील बंदर म्हणून ई विकसित केल्या जाणाऱ्या वाढवण बंदरापर्यंत त्याच्या विस्तारालाही 5 मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा मुख्य भाग ५५.१२ किलोमीटरचा उत्तन-विरार सी लिंक आहे, ज्यामध्ये २४.३५ किलोमीटरचा मुख्य सागरी पूल आणि ३०.७७किलोमीटरचे हायस्पीड कनेक्टर रस्ते समाविष्ट आहेत. पूर्ण झाल्यानंतर हा मुख्य पूल भारतातील सर्वात लांब सागरी पूल ठरेल, अशी अपेक्षा आहे.

हा सहा पदरी कॉरिडॉर आणीबाणीच्या लेन, नेव्हिगेशनल स्पॅन्स आणि एकात्मिक इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिमसह (आयटीएस) जलद, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम प्रवासासाठी तयार करण्यात आला आहे.

'एमएमआरडीए' च्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे वाहतूककोंडी आणि प्रवासाचा वेळकमी होईल, वाहनांचे उत्सर्जन कमी होईल, प्रवासी व मालवाहतूक सुधारेल, तसेच मुंबई महानगर प्रदेशात व्यापार, लॉजिस्टिक, औद्योगिक विकास, पर्यटन, गृहनिर्माण आणि रोजगाराला चालना मिळेल.

सागरी वाहतूक कॉरिडॉर विकसित होणार

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे जोडणीला मिळालेली ही नवीन तत्त्वतः मंजुरी आणि वाढवण बंदरापर्यंतचा आधीच मंजूर झालेला विस्तार यामुळे दक्षिण मुंबईला वसई, विरार, पालघर आणि राष्ट्रीय एक्स्प्रेस वे नेटवर्कशी जोडणारा भारतातील सर्वात महत्त्वाचा सागरी वाहतूक कॉरिडॉर विकसित होण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल पडले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली