मुंबई

वंचितचे मुंबईतील उमेदवार जाहीर

मुंबई उत्तरमधून बीना रामकुमार सिंग यांना तर मुंबई उत्तर-पश्चिममधून संजीव कुमार आप्पाराव कलकोरी, तर मुंबई दक्षिण-मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य या लोकसभा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई उत्तरमधून बीना रामकुमार सिंग यांना तर मुंबई उत्तर-पश्चिममधून संजीव कुमार आप्पाराव कलकोरी, तर मुंबई दक्षिण-मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर रायगडमधून कुमुदानी रवींद्र चव्हाण, उस्मानाबादहून भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, नंदूरबारहून हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी, जळगावहून-प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा, दिंडोरीहून-गुलाब मोहन बरडे, पालघरमधून-विजया म्हात्रे व भिवंडीतून निलेश सांबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन