मुंबई : विजेचा शॉक बसलेल्या महिलेला बुधवारी रात्री उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परंतु डॉक्टर टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घालत तोडफोड करण्यात सुरुवात केली. या प्रकरणी ५ ते ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.
विजेचा धक्का बसलेल्या ३१ वर्षीय शबाना शेख या महिलेला बुधवारी रात्री १०.३० च्या सुमाराला कूपर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यावेळी अपघात विभागात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी महिला मृत असल्याचे सांगितले. महिला मृत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईक संतापले. तिच्यावर उपचार करा, असा दम देत नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली.
महिलेला रुग्णालयात आणल्यानंतर तिच्यावर डॉक्टरांनी उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र, ती महिला उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. तरीही कर्तव्यावर उपस्थित डॉक्टरांनी आपले प्रयत्न केले. रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.डॉ. देवदास शेट्टी, अधिष्ठाता, कुपर रुग्णालय