मुंबई

दौंड, किर्लोस्करवाडीलाही वंदे भारत रेल्वे थांबणार

निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी-पुणे वंदे भारत या गाड्यांना या दोन्ही स्थानकात थांबे देण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : वंदे भारत गाड्यांची मागणी लक्षात घेता रेल्वेने प्रायोगिक तत्वावर वंदे भारत गाड्यांना दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवरही थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी-पुणे वंदे भारत या गाड्यांना या दोन्ही स्थानकात थांबे देण्यात येणार आहेत.

उच्च वेग, सुरक्षा मानके आणि आधुनिक प्रवास अनुभव यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. २२२२५/२२२२६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा राहील. गाडी क्रमांक २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबरपासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे रात्री १०.१३ वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक २२२२६ सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे सकाळी ८.०८ वाजता पोहोचेल. तसेच २०६७०/ २०६६९ पुणे-हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा किर्लोस्करवाडी येथे राहील.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी