वसई क्लोरीन गॅस गळतीप्रकरणी मनपा दोषी; भुपेश कडुलकर यांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली 
मुंबई

वसई क्लोरीन गॅस गळतीप्रकरणी मनपा दोषी; भुपेश कडुलकर यांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली

वसई पश्चिमेतील सनसिटी टाकीजवळ ठेवलेल्या जुन्या क्लोरीन सिलिंडरमधून अचानक गॅसची गळती सुरू झाल्याने मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेत सुमारे १२ जण बाधित झाले आणि एकाचा मृत्यू झाला.

Swapnil S

वसई : वसई पश्चिमेतील सनसिटी टाकीजवळ ठेवलेल्या जुन्या क्लोरीन सिलिंडरमधून अचानक गॅसची गळती सुरू झाल्याने मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेत सुमारे १२ जण बाधित झाले आणि एकाचा मृत्यू झाला. घटनास्थळी तत्काळ दाखल झालेल्या आगरी कोळी सेनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश कडुलकर यांनी धाडसाने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी अग्निशमन विभागाकडे मूलभूत ऑक्सिजन किटची कमतरता असल्याचा आरोप करत या दुर्घटनेला मनपा दोषी असल्याचे कडुलकर यांनी म्हटले.

कडुलकर यांनी घटनास्थळी मास्क घालून गॅसचा प्रसार जास्त असलेल्या भागात जाऊन नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या. काही नागरिक बाहेर आल्याने ते बाधित झाले, मात्र कडुलकर यांनी तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला कॉल करून परिस्थितीची माहिती दिली आणि दोन्ही यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. कडुलकर यांनी अग्निशमन विभागाकडे मूलभूत ऑक्सिजन किटची कमतरता असल्याचा आरोप केला. “जीव धोक्यात घालून काम करणारे जवान जर सुरक्षित नसतील, तर ही मनपाची मोठी चूक आहे,” असे त्यांनी म्हटले. पोलिसांच्या माहितीनुसार, देव पार्डीकर (५९) यांचा मृत्यू झाला आहे. वसई पेटिट रुग्णालयात अनिश सोलंकी (१५), देवांग शहा (४६), शांता सोलंकी (६२), अंजली राठोड (१९) आणि प्रिया राठोड (१४) यांना दाखल करण्यात आले असून ते स्थिर आहेत. तर अनिल पाटील (३५) आणि योगेश पाटील (३५) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बंगली रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कडुलकर यांनी ही दुर्घटना टाळण्यासाठी क्लोरीन सिलिंडरला सनसिटी परिसरातील पाण्यात टाकून विल्हेवाट लावली गेल्याचे सांगितले.

उपअभियंत्यावर कारवाई करा

वसई दिवाणमान येथील क्लोरीन सिलिंडर गळतीच्या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेंद्र ठाकरे तसेच संबंधित दोषी पालिका अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे वसई रोड मंडळाचे अध्यक्ष महेश सरवणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दर क्लोरीन सिलिंडर अनेक वर्षांपासून पाण्याच्या टाकीखाली पडून असल्याचा दावा समाजमाध्यमांवर केला जात आहे. त्यामुळे सिलिंडर त्या ठिकाणी ठेवला कोणी?, तो अनेक वर्षे पडून असेल तर त्याचे ऑडिट का झाले नाही?, पाणीपुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागाने तपासणी का केली नाही?, असे अनेक गंभीर प्रश्न सरवणकर यांनी उपस्थित केले आहेत.

कोकणात राणे बंधू वाद टोकाला; निलेश राणेंच्या स्टींग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "हमाम में तो सब...

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार

Pune : हिंजवडीतील अंगणवाडी सेविकेचा प्रताप; २० चिमुकल्यांना कोंडून मीटिंगसाठी पसार, मुलांचे रडून हाल, धक्कादायक Video समोर

वयाच्या ५५ वर्षांनंतर व्हायचंय आईबाबा! सहाय्यक प्रजनन उपचारांतील वयाचे निर्बंध कमी करण्याची विनंती; निपुत्रिक दाम्पत्य हायकोर्टात

"आता फक्त आठवणी उरल्यात..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ३ दिवसांनी हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया; खास फोटोही केले शेअर