वसईत नाताळ आगमनाची उत्साहपूर्ण सुरुवात; प्रत्येक रविवारी आशेची वेगवेगळी ज्योत 
मुंबई

Mumbai: वसईत नाताळ आगमनाची उत्साहपूर्ण सुरुवात; प्रत्येक रविवारी आशेची वेगवेगळी ज्योत

नाताळ जरी २५ डिसेंबरला साजरा केला जात असला, तरी ख्रिस्ती समाजातील आध्यात्मिक तयारीची सुरुवात चार आठवड्यांपूर्वीच होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्वागतार्थ साजरा होणाऱ्या आगमन काळातील पहिला रविवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर वसई-विरार परिसरातील सर्व चर्चमध्ये ३० नोव्हेंबर रोजी जांभळी मेणबत्ती प्रज्वलित करून नाताळ उत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

Swapnil S

अनिलराज रोकडे/वसई : नाताळ जरी २५ डिसेंबरला साजरा केला जात असला, तरी ख्रिस्ती समाजातील आध्यात्मिक तयारीची सुरुवात चार आठवड्यांपूर्वीच होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्वागतार्थ साजरा होणाऱ्या आगमन काळातील पहिला रविवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर वसई-विरार परिसरातील सर्व चर्चमध्ये ३० नोव्हेंबर रोजी जांभळी मेणबत्ती प्रज्वलित करून नाताळ उत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

लहान मुलांचा निष्पापपणा प्रभूला अधिक प्रिय मानला जात असल्याने, अनेक चर्चमध्ये लहान मुलांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलन करून धार्मिक विधी पार पाडण्यात आले. भक्तगण, कुटुंबीयांच्या उपस्थितीने चर्च परिसर शांतता, आनंद आणि आध्यात्मिक भावनांनी न्हाऊन निघाला. जांभळा रंग आशा व पापमुक्तीचे प्रतीक मानला जातो. संदेष्टा यशया यांनी प्रभूच्या आगमनाची दिलेली भविष्यवाणी याच दिवशी स्मरणात ठेवली जाते. सेंट थॉमस चर्च, सांडोर येथे फादर अँड्रू रॉड्रिग्ज आणि फादर ज्योयल कोरिया यांनी जांभळ्या मेणबत्तीचे प्रज्वलन करून नाताळाच्या आगमनाची सुरुवात केली. श्रद्धाळूंनी स्तुतिगीते, प्रार्थना आणि विशेष आशीर्वादांचा लाभ घेत शांतता आणि सकारात्मकतेचा संदेश आत्मसात केला.

मेणबत्ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देते; मानवानेही समाजासाठी प्रकाश बनावे, असे प्रेरणादायी विचार फादर ज्यो अल्मेडा यांनी व्यक्त केले. तर पहिल्या आठवड्यात विशेषतः बालकांसाठी प्रार्थना केली जाते, अशी माहिती फादर रेमंड रुमाव यांनी दिली.

जांभळ्या रंगाने नाताळाच्या तयारीची सुरुवात

जांभळ्या मेणबत्तीच्या प्रकाशाने वसई-विरार परिसर आशा, सकारात्मकता, नूतन विचार आणि श्रद्धेच्या उत्सवाने उजळून निघाला. नाताळ सणाच्या तयारीला या आध्यात्मिक उत्साहपूर्ण सुरुवातीने रंगत आली आहे.

आठवड्यानुसार प्रज्वलित होणाऱ्या मेणबत्त्यांचा विशेष प्रतीकात्मक अर्थ

  • पहिला रविवार - जांभळी मेणबत्ती : आशा

  • दुसरा रविवार - जांभळी मेणबत्ती : शांती

  • तिसरा रविवार - जांभळी मेणबत्ती : आनंद

  • चौथा रविवार - गुलाबी मेणबत्ती : प्रीती

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

ठाण्यात भाजपला डावलल्याचा आरोप; 'सात प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन करा', आयुक्तांना पत्र

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video

कोल्हापूर-सांगलीचा पूर रोखणार; ३२०० कोटींची योजना; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Bhayandar : लग्नाच्या रिसेप्शनला न गेल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेला मुलगा चाकूचा वार लागून ठार