मुंबई

क्यों किया ऐसा मेरे साथ...म्हणत भररस्त्यात प्रेयसीची निर्घृण हत्या; वसईतील थरकाप उडवणारी घटना

भररस्त्यात आरोपी रोहितनं आरतीला गाठलं. त्याचा तिच्याशी वाद झाला आणि संतापाच्या भरात त्यानं...

Suraj Sakunde

मुंबई: वसईमध्ये एका तरुणीची भररस्त्यात लोखंडी पान्यानं प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. हत्या केल्यानंतर तरुण मृतदेहाजवळ बसून होता. वाळीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

आरती रामदुलार यादव (वय २२) असं मृत तरूणीचं नाव असून ती नालासोपाऱ्यातील गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीजमध्ये काम करत होती. आरोपी रोहित यादव (वय २९) याच्याशी तिचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती.

भररस्त्यात केली निर्घृण हत्या-

मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितनं तिला अडवले. यावेळी दोघांचं भांडण झालं. यावेळी संतप्त झालेल्या रोहितनं सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने आरतीवर एकामागून एक असे सुमारे १५ वेळा प्रहार केले. हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून होता. वालीव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं.

क्यों किया ऐसा मेरे साथ...

या घडनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी रोहितनं लोखंडी पान्यानं वार करून आरतीला संपवल्याचं दिसत आहे. "क्यों किया ऐसा मेरे साथ.." असा रोहितचा आवाजही ऐकू येत आहे.

रोहित प्रहार करत होता अन् लोक व्हिडिओ काढत होते...

विशेष म्हणजे रोहित आरतीवर लोखंडी पान्यानं प्रहार करत असताना अनेक लोक घटनास्थळी उपस्थित होते. परंतु कोणीही रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट लोक व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. एका व्यक्तीनं पुढं जायचा प्रयत्न केला, परंतु आरोपीनं त्याच्यावर पाना उगारल्यानं तो माघारी फिरला. जर लोकांनी धाडस दाखवून रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित आरतीचा जीव वाचला असता, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश