फोटो सौजन्य : फेसबुक (Vasai Vaibav)
मुंबई

वसईत शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न उधळला; बनावट तृतीयपंथींच्या वेशातील चौघांना स्थानिकांकडून चोप

वसईतील पापडी-मुलगाव परिसरात दोन शाळकरी मुलींना फसवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Swapnil S

वसई : वसईतील पापडी-मुलगाव परिसरात दोन शाळकरी मुलींना फसवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तृतीयपंथी वेशातील तीन पुरुष आणि एक रिक्षाचालक मिळून हे कृत्य करण्याच्या प्रयत्नात होते. तथापि, सतर्क नागरिकांनी चारही आरोपींना पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

ही घटना सोमवारी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास घडली. खोंचिवडे गावातील दोन अल्पवयीन मुली शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना, पापडी-मुलगाव परिसरात एका ऑटोरिक्षातून आलेल्या चौघांनी त्यांना थांबवले. तृतीयपंथी असल्याचा आभास निर्माण करत त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने संवाद सुरू केला. त्यानंतर मुलींना जबरदस्तीने रिक्षात बसवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुलींनी आरडाओरडा केल्याने नागरिक सतर्क झाले. नागरिकांनी चौघांनाही पकडले आणि मारहाण करत वसई पोलिसांच्या हवाली केले. आरोपींमध्ये शरद शिंदे, संजय गोलंकार, निलेश मांदवकर (तिघेही तृतीयपंथी वेशात) आणि रिक्षाचालक सूरज माटोल यांचा समावेश असून, सर्वजण ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील रहिवासी आहेत. या चारही आरोपींकडून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी तृतीयपंथीचा वेष परिधान करून परिसरात भीक मागण्याच्या बहाण्याने फिरत होते. मात्र याआधीही त्या परिसरात ते संशयास्पद हालचाली करत होते.

न्या. वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव प्रथम लोकसभेत मांडणार

अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्राची बंदी

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र

महायुती : अंतर्गत संघर्ष आणि जनतेच्या अपेक्षा

शाळा बंदी+शिक्षक बंदी= शिक्षण बंदी