Vasai : शासकीय ‘बसीन’ हे नाव बदलून ‘वसई’ करावे! वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिला नामकरणाचा प्रस्ताव 
मुंबई

Vasai : शासकीय ‘बसीन’ हे नाव बदलून ‘वसई’ करावे! वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिला नामकरणाचा प्रस्ताव

वसई-विरार शहर महानगरपालिकेने वसईचे पौराणिक तीर्थ व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत ‘ऐतिहासिक वारसा संवर्धन प्रकल्प’ राबवण्याचे ठरवले असून ‘स्वारस्याची अभिव्यक्ति’साठी अर्ज मागवले आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने वसईचे पौराणिक तीर्थ व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत ‘ऐतिहासिक वारसा संवर्धन प्रकल्प’ राबवण्याचे ठरवले असून ‘स्वारस्याची अभिव्यक्ति’साठी अर्ज मागवले आहे. ऐतिहासिक वारसा, निसर्ग तसेच तीर्थांचे जतन करण्यासाठी कृतिशील असलेले र्धमसभा-विद्वत्संघाचे अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी, सरकारी स्तरावर जिथे-जिथे ‘बसीन’ नाव आहे ते बदलून देशी नाव ‘वसई’ असे करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी केली आहे. वसई ही भगवान परशुराम निर्मित भूमि असून यात विकुंभ पर्वतावरून आलेल्या ४० ऋषी-मुनींची व त्पांच्या अनुयायींची सुसंस्कृत वस्ती वसवण्यात आली होती. मुनींचे वसतीस्थान म्हणून ‘वसई’ असे प्राकृत भाषेचे तज्ञ जाणतात.

धनंजयशास्त्री वैद्य म्हणाले की, वसई परिसरात भगवान श्रीराम, सांदिपनी ऋषी व भगवान श्रीकृष्ण, पाच पांडव यांप्रमाणेच गौतम बुद्धांचे शिष्य पूर्णा, लंकेचा राजा विजय, जैन श्रमण, धर्मराजा-बुरुडराजा यांचे वास्तव्य झाले. १२ व्या शतकात गुजरातच्या अह्निल-वाड येथील बिंबदेव यादव राजाने वसईत शासन स्थापन केले. त्यांच्या सेबत वाडवळ, भंडारी, आगरी असे विविध समाज व त्यांचे पूजारी ८०० वर्षांपूर्वी वसईत आल्याचे बखरीत उल्लेख आहेत. पुढे वसईत पोर्तुगीजांची फेथांध जुलमी राजवट आली. पण याच वसईतच १६ व्या शतकात फादर स्टीफन्स यांनी ‘ख्रिस्त-पुराण’ लिहिले व सन १५५७ ला स्थानिक-मातेच्या पोटी जन्मलेले गोन्सालो गार्सिया हे कॅथॉलिक पंथातील प्रसिद्ध सेंट जन्मले. यांनीही वसईचे नाव जगभरात भूषवले तसेच वसईला पहिला ‘पद्मश्री’ पुरस्काराचा मान मिळला तो १९६१ ला. वसईत जन्मलेल्या रघुनाथ फडके यांच्यामुळे. वसईला दुसरा ‘पद्मश्री’चा मान मिळाला १९९१ ला भाऊसाहेब वर्तक यामुळे. वसईला तिसरा ‘पद्मश्री’चा मान मिळाला २००९ ला मद्य-मुक्ति व एड्सग्रस्तांसाठी सेवा प्रकल्प राबवणारे फादर जोझेफ परेरा यांमुळे, असे ते म्हणाले.

स्वदेशी नावे देण्यावर भर

सरकारी स्तरावर जिथे-जिथे ‘बसीन’ नाव आहे ते बदलून देशी नाव ‘वसई’ असे करण्यात यावे. तसेच, येणार्या नव्या प्रकल्पांना ऐतिहासिक वारशानुसार नामकरण करणे महत्त्वाचे आहे. पहिले विरारजवळील समुद्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘सेंट गोन्सालो गार्सिया इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे नाव द्यावे. एक्स्प्रेस हायवेच्या वसई-विरार एक्झिटला ‘भगवान श्री परशुराम भूमी एक्झिट’ असे नाव द्यावे. वसई रेल्वे टर्मिनसला ‘शूर्पारक टर्मिनस’ असे नाव द्यावे. बुलेट ट्रेनच्या स्टेशनला ‘पूर्णा स्थानक’ नाव द्यावे. पूर्णा हे गौतम बुद्धांचे वसईत जन्मलेले प्रसिद्ध शिष्य होते. तसेच मेट्रो रेल्वेच्या प्रथम स्थानकाला ‘राजा बिंबदेव स्थानक’ असे नाव द्यावे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : पाणीप्रश्नावर ठेकेदारांची ‘मस्ती’; कामे अर्धवट ठेवणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी, नगरसेवकांचा सभागृहात संताप

महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस

Mumbai : गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचे वाटप; तीन हजार लिटर कलरचे वितरण

ठाण्यात तीन तडीपार गुन्हेगारांना घेतले ताब्यात