मुंबई

सीएसएमटी स्थानकानजीकच्या भुयारी मार्गात वायूविजन; हवा खेळती राहण्यासाठी ९ जेट पंखे; अधिक क्षमतेच्या पंख्याने गारवा राहणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली नव्या तंत्रज्ञानासह अंमलात येत आहे.

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली नव्या तंत्रज्ञानासह अंमलात येत आहे. भुयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी नव्या प्रणालीमुळे मदत होणार आहे. भुयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दी असताना होणारी अस्वस्थतता कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच भुयारी मार्गातील गरम हवा बाहेर टाकण्याचे काम मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवासी, पादचारी, पर्यटक यांच्यामार्फत भुयारी मार्गाचा वापर करण्यात येतो. भुयारी मार्गाच्या ठिकाणी खेळती हवा राहावी, यासाठी प्रणाली अस्तित्वात आहे.  भुयारी मार्गाचा होणारा आत्यंतिक वापर पाहता आधुनिक व अद्ययावत उपाययोजना करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार अधिक क्षमतेचे वायूविजन आणि हवा खेळती राहील याअनुषंगाने अद्ययावत प्रणाली संपूर्ण भुयारी मार्ग परिसरात अंमलात आणण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.

भुयारी मार्गाच्या ठिकाणी अद्ययावत वायूविजन प्रणालीअंतर्गत एकूण ९ जेट पंखे संपूर्ण भुयारी मार्ग परिसरात लावण्यात येत आहेत. या जेट पंख्यांमुळे भुयारी मार्गाच्या प्रवेशाच्या ठिकाणची हवा आतमध्ये वेगाने आणण्यासाठी मदत होईल.  तसेच २ अधिक क्षमतेचे पंखे मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात येत आहेत.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

KDMC Election : पहिल्याच दिवशी ३११ कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

BMC Election : मुंबई फक्त राजकीय आखाडाच आहे का?