मुंबई

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे झोपेतच निधन

भारतीय रेल्वे यांत्रिक अभियांत्रिकी सेवा (आयआरएसएमइ) १९८८ बॅचचे अधिकारी आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार गुप्ता यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Swapnil S

मुंबई : भारतीय रेल्वे यांत्रिक अभियांत्रिकी सेवा (आयआरएसएमइ) १९८८ बॅचचे अधिकारी आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार गुप्ता यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रोजच्या वेळेत झोपेतून न उठल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार हे भारतीय रेल्वे अभियंता सेवेच्या १९८८ च्या बॅचचे अधिकारी होते.

विवेक कुमार गुप्ता यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

विजय कुमार गुप्ता यांच्या निधनानंतर विवेक कुमार गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यात आला आहे. भारतीय रेल्वे अभियंता सेवेच्या १९८८ च्या बॅचचे अधिकारी विवेक कुमार गुप्ता हे सध्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी, ते नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते.

Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही

मुंब्रामध्ये ATS ची मोठी कारवाई; शिक्षकाच्या घरावर छापा, अल-कायदा प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय

सांगलीत हत्येचा थरार! आधी बर्थडे पार्टीत जेवले, मग केले सपासप वार; दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचा खून

मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंगा विभागातील काही परिसरांना झळ बसणार

अचानक बेशुद्ध पडल्याने अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल