मुंबई

Mumbai : विले पार्लेतील इमारतीला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू तर एक जखमी, Video व्हायरल

आग लागल्यानंतर अग्निशमन दलासह पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक पालिका पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील सर्व रहिवाशांना तात्काळ बाहेर काढले.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईच्या विले पार्ले पूर्व परिसरात सोमवारी (९ फेब्रुवारी) सकाळी एका निवासी इमारतीत भीषण आग लागून एका महिलेचा मृत्यू झाला असून, दुसरी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सकाळी सुमारे ९.५१ वाजता कुंकुवाडी परिसरातील फिरोजशहा मेहता रोडवरील सुविधा पर्ल या निवासी इमारतीत घडली.

माहितीनुसार, ग्राउंड प्लस १३ मजली असलेल्या या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आग लागली होती. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या दोन मिनिटांत, म्हणजेच सकाळी ९.५३ वाजता, अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल-१ घोषित केले.

महिलेचा दुर्दैवी मृत्यू

या आगीत ६३ वर्षीय भावना सात्रा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ३४ वर्षीय अनेरी या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर अग्निशमन दलासह पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक पालिका पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील सर्व रहिवाशांना तात्काळ बाहेर काढले. आग इतर मजल्यांपर्यंत पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले.

आगीचे कारण अस्पष्ट

तथापि, ही इमारत पूर्णपणे निवासी असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग कशी लागली, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video