मुंबई

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडीच्या तपासात समोर आले सत्य

वृत्तसंस्था

शिवसंग्राम प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. राज्य सीआयडीने त्यांच्या गाडी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे ५ वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले पण तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन, आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते. सीआयडीने केलेल्या चौकशीमध्ये ते ज्या मार्गावर गेले होते, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज समोर आले. यावेळी चालक ताशी १२० ते १४० किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. या तपासानंतर सीआयडीने चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात रसायनी पोलिस ठाण्यात सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश