ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची संख्या घटली; विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द 
मुंबई

ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची संख्या घटली; विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद अखेर रद्द

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापौर रितू तावडे यांनी सोमवारी सभागृहात याबाबतची घोषणा केली.

Swapnil S

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापौर रितू तावडे यांनी सोमवारी सभागृहात याबाबतची घोषणा केली. विशाखा राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेविका, एमआयएम पक्षाच्या दोन नगरसेविका ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद झाल्याने आतापर्यंत पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची संख्या ६३ वर आली आहे.

विशाखा राऊत यांनी महापालिका निवडणूक दादर प्रभाग क्रमांक १९१ मधून महिला ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. तर शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांनी राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. विशाखा राऊत यांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव केला. त्यानंतर प्रिया यांनी राऊत यांच्याविरोधात पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

पाच नगरसेवक बाद

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) कुर्ला, प्रभाग क्रमांक १७० मधील नगरसेविका बुशरा कप्तान मलिक, मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १३८ मधील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका रोशन शेख, तर एमआयएमच्या गोवंडी प्रभाग क्रमांक १३७ मधून निवडून आलेले शमीर पटेल, एस वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १११ चे ठाकरे सेनेचे नगरसेवक दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत नगरसेवक पद रद्द झाले आहे. तर सोमवारी विशाखा राऊत यांचेही नगरसेवक पद रद्द झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जरांगेंची मोर्चेबांधणी; १२ सप्टेंबरला मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन, पोलीस कारवाई झाल्यास '१० मिनिटांत महाराष्ट्र बंद'

जात प्रमाणपत्रांचा वाद : ७९ प्रकरणे न्यायालयात; ठाकरेंचे २४, तर भाजपचे १६ नगरसेवक अडचणीत

MPSC Paper Leak : विद्यार्थ्यांचा आक्रोश! सततच्या पेपरफुटीविरोधात पुण्यात तीव्र संताप

MPSC Paper Leak : ठोस पुरावा दिल्यास पद सोडणार; भीमनवार यांचे प्रत्युत्तर

धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी; सरकारचा आदेश, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट