मुंबई

कुर्ला, घाटकोपर, वडाळा भागातील पाणीपुरवठा बंद काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

प्रतिनिधी

पूर्व उपनगरामध्ये ‘एन’ विभागातील सोमैया नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे फेज-१ चे काम बुधवार, १८ मे रोजी सकाळी १० वाजेपासून गुरुवार १९ मे सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत बुधवारी सकाळी १० वाजेपासून गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

दरम्यान, या परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘एल पूर्व’ विभाग!

राहूल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘एन’ विभाग!

राजावाडीचे सर्व क्षेत्र, (एम. जी. मार्गाची पश्चिम बाजू), चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हेली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ. एन. जी. सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘एम पश्चिम’ विभाग!

टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर १४९ व १५१ या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘एफ उत्तर’ विभाग!

वडाला ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतिक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘एफ दक्षिण

दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार.

शहर दक्षिण

परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत