मुंबई

प्रवाशांसाठी खुशखबर! होळीनिमित्त पश्चिम रेल्वेकडून ‘या’ मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या; वाचा सविस्तर

आंतरराज्य मार्गांसह गुजरातमधील प्रादेशिक मार्गांवरील सेवा मार्च महिन्यापर्यंत वाढवण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अनेक विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराज्य मार्गांसह गुजरातमधील प्रादेशिक मार्गांवरील सेवा मार्च महिन्यापर्यंत वाढवण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती पश्चिम रेल्वेने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्या

१. मुंबई सेंट्रल-इंदौर-मुंबई सेंट्रल (क्र. ०९८५/०९०८६) - त्रैसाप्ताहिक विशेष गाडी २७ आणि २८ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

२. मुंबई सेंट्रल-भिवानी-मुंबई सेंट्रल (क्र. ०९००१/०९००२) - २७ आणि २८ मार्च २०२६ पर्यंत चालवली जाणार आहे.

३. दादर-भुसावळ-दादर विशेष गाड्या

  • दादर-भुसावळ (क्र. ०९०४९) आणि भुसावळ-दादर (क्र. ०९०५०) २७ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्या.

  • दुसऱ्या साप्ताहिक सेवांमध्ये दादर-भुसावळ (क्र. ०९०५१) व भुसावळ-दादर (क्र. ०९०५२) २८ मार्च २०२६ पर्यंत चालवली जाणार आहेत.

४. बांद्रा टर्मिनस-भिवानी-बांद्रा टर्मिनस (क्र. ०९००५/०९००६) - पुढील प्रवासासाठी २५ मार्च २०२६ पर्यंत आणि परतीसाठी २७ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

५. सूरत-मंगळुरू-सूरत (क्र. ०९०५७/०९०५८) - द्वैसाप्ताहिक विशेष गाडी २९ आणि ३० मार्च २०२६ पर्यंत चालवली जाणार आहे.

तर, प्रादेशिक सेवांमध्ये गांधीग्राम-बोताड-गांधीग्राम (क्र. ०९२११/०९२१२) आणि भावनगर-ढोला -भावनगर (क्र. ०९५३०/०९५२९) या दैनंदिन विशेष गाड्या ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

सर्व पीआरएस काउंटर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर १७ फेब्रुवारीपासून वाढीव फेऱ्यांसाठी रिझर्व्हेशन सुरू झाले आहे. प्रवाशांनी गाड्यांचे थांबे, वेळापत्रक आणि रचना अधिकृत रेल्वे चौकशी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या संकेतस्थळावर तपासून घ्यावी आणि नंतरच रिझर्व्हेशन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

बुलेट ट्रेनचा खर्चही सुस्साट! मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट; १ लाख कोटीवरून २ लाख कोटी

MPSC Paper Leak: तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत; अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

नियम तोडाल तर कारवाई होणारच; मुंढेंचा इशारा; सणासुदीत भेसळयुक्त विक्रेत्यांवर FDA ची नजर, नवी नियमावली आज करणार जारी