File photo
File photo ANI
मुंबई

त्या व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य काय ? पेडणेकर विरुद्ध भाजपा जुंपली

प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील याकुब मेमनच्या कबरीवरून जोरदार राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण झाल्याचा दावा भाजप करत असताना शिवसेनेकडून मात्र जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आता याकुब मेमनचे नातेवाईक असलेल्या रऊफ मेमनची भेट कोणाकोणासोबत झाली झाली? यावरून राजकारणही सुरू झाले आहे. या संदर्भात भाजपने एक व्हिडिओ जारी केला असून त्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रउफ मेमन यांच्यासोबत बैठक घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आता किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया देत रऊफ मेमन यांच्यासोबतचे राज्यपाल तसेच देवेंद्र फडणवीस यांचे फोटो मीडियाला दाखवले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये किशोरी पेडणेकर आणि रऊफ मेमन एका बैठकीत दिसत आहेत. ही सभा बडा स्मशानभूमीत झाली असून 20 ते 25 लोक तिथे उपस्थित होते, असा दावा भाजप करत आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया