उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र
मुंबई

अमित शहा यांचा बोलविता धनी कोण? - उद्धव ठाकरे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. अमित शहा यांचा बोलविता धनी कोण? भाजप की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व संघावर निशाणा साधला.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. अमित शहा यांचा बोलविता धनी कोण? भाजप की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व संघावर निशाणा साधला.

‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहा यांनी संसदेत बोलताना डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही अमित शहा यांच्यावर वक्तव्यावरून भाजपवर निशाणा साधला. भाजपचे उर्मट नेते हे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सातत्याने करीत आहेत. भाजपचे ढोंग आता समोर आले आहे. भाजपचे हिंदुत्व म्हणजे ‘मुँह मे राम आणि बगल में छुरी’ असे आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

भाजपला महाराष्ट्र संपवायचा आहे. आपल्याशिवाय दुसरे कोणीही देशात जन्माला आलाच नाही, असे त्यांना दाखवून द्यायचे आहे. आधी नेहरुंचे नाव घेत टीका करत होते, आता हे बाबासाहेब आंबेडकरांवर बोलू लागले आहेत. भाजपची हिंमत एवढी वाढली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपाला पाठिंबा देणारे जे नितीश कुमार, चंद्राबाबू आहेत ते काय करत आहेत? असे त्यांना विचारायचे आहे. रामदास आठवले काय करत आहेत? भाजपसह जे आमचे मिंधे गेले, त्यांना आणि अजित पवारांना बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीला केला.

भगतसिंग कोश्यारी नावाचे एक गृहस्थ राज्यपाल म्हणून बसवले गेले होते, तेव्हा त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. तेव्हा त्यांनी लग्नाच्या वयावरून हसत हसत एक विचित्र टिपण्णी केली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला होता. आम्ही मोर्चे काढत विरोध केला होता. मात्र, भाजपने कोश्यारींना माफी मागायला लावली, ना त्यांना दूर केले. मुंबईचे महत्त्व कमी करायला भाजपचा डाव आहे. भाजपच्या वरिष्ठांना महाराष्ट्र हा गांडुळांचा प्रदेश वाटू लागला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य