मुंबई

राज्यातील रुग्णालयात लवकरच मास्क सक्ती; टास्क फोर्स अध्यक्षांची माहिती

देशात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिका रुग्णालयांत मास्क सक्ती करण्यात आली आहे.

गिरीश चित्रे

देशात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिका रुग्णालयांत मास्क सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील रुग्णालयात ही मास्क सक्ती करण्यात यावी, अशी सूचना केल्याचे राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णसंख्येत काही दिवसांत घट दिसत असली तरी कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले, सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फेब्रुवारी मध्यानंतर कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होत असून, मुंबईत रोज आढळणारी रुग्णसंख्या तीन अंकावर पोहोचली आहे, तर राज्यात रोज आढळणारी रुग्ण चार अंकावर पोहोचली आहे. तसेच बाधित रुग्णाचे रोज एक दोन मृत्यू होत असल्याने कोरोनाचे टेंशन कायम आहे. मुंबईत कोरोनाचा वाढता आकडा पहाता मुंबई महापालिका रुग्णालयांत १० एप्रिलपासून मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

दोन ते तीन दिवसांत बैठक

कोरोना बाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात राज्यातील रुग्णालयात मास्क वापर सक्तीचे करण्यात यावे, अशी सूचना राज्य सरकारला केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, याबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक होणार असून, राज्यातील रुग्णालयात मास्क सक्तीचा निर्णय होणे अपेक्षित असल्याचे डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले.

कोवॅक्सिन लस उपलब्ध करा!

मुंबईसह राज्यात लसीचा साठा उपलब्ध नाही. मुंबईत इन्कोव्हॅक लस नाकावाटे देण्यात येणारी उपलब्ध झाली आहे; मात्र ही लस फारशी उपयुक्त ठरेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कोवॅक्सिन व कोबोॅवॅक्सीन लशीच्या मात्रा उपलब्ध करा, अशी सूचना राज्य सरकारला केल्याचे डॉ. साळुंके यांनी सांगितले.

सहव्याधी असलेल्यांनी मास्क वापरा!

६० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा सातत्याने उपयोग करणे हे त्यांच्यासाठी सुरक्षित ठरेल. त्यांना मास्कची सक्ती नसली तरी खबरदारी घेणे हे अधिक योग्य आहे. शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले