मुंबई

विद्यार्थ्यांची यंदाची शाळा 'पावसातच' भरणार? पावसाळ्यातील उपयुक्त वस्तुचे अद्याप वाटप नाही

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून दोन दिवसांपूर्वीच शालेय वस्तू वितरणाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली

गिरीश चित्रे

वरुणराजाचे आगमन झाले तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय वस्तुंसह पावसाळ्यात उपयुक्त असलेली छत्री व रेनकोटचे वाटप होऊ शकलेले नाही. २७ शालेय वस्तू पुरवठ्याचे कंत्राट दिले असले तरी छत्री व रेनकोटचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारच पुढे आलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची यंदाची शाळा 'पावसातच' भरणार असून प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी शाळा सुरु होताच पहिल्या दिवशी गाजावाजा करत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात येते. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून दोन दिवसांपूर्वीच शालेय वस्तू वितरणाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांना लवकरच शालेय वस्तूंचे वाटप होईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र निविदा प्रक्रियेला उशीर, प्रस्ताव मंजुरीला उशीर यामुळे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू कधीपर्यंत मिळतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेवर असलेल्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेले विद्यार्थी पालिका शाळांत शिक्षणासाठी येत असल्याने अशा विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके, वाॅटर बाॅटल, छत्री रेनकोट अशा २७ शालेय वस्तू २००७ पासून मोफत देण्यात येतात. सन २०२२ - २३, २०२३ - २४ या दोन वर्षांसाठी शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ७ कोटी ३५ लाख ७८ हजार ८८७.०७ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यात रेनकोट, फोल्डिंग छत्र्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र कंत्राटदाराने प्रतिसाद न दिल्याने छत्री व रेनकोट खरेदीचे कंत्राट तूर्तास वेटींगवर आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच विद्यार्थ्यांना छत्री व रेनकोट मिळणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री