मुंबई

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी चार महिलांना अटक

मुलगी एका रिक्षात बसल्याचे एका व्यक्तीने सांगितले. ही मुलगी खुशबू गुप्ता ऊर्फ खुशी हिच्यासोबत होती. त्या रिक्षात आणखीही महिला होत्या.

Swapnil S

ऐश्वर्या अय्यर/मुंबई

२४ मार्चच्या रात्री ५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अवघ्या १२ तासांत चार महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फुगे घेण्यासाठी दुकानात गेली. मात्र, ती घरी परत आलीच नाही. त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. ही मुलगी एका रिक्षात बसल्याचे एका व्यक्तीने सांगितले. ही मुलगी खुशबू गुप्ता ऊर्फ खुशी हिच्यासोबत होती. त्या रिक्षात आणखीही महिला होत्या. तिच्या पालकांनी तत्काळ भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ चौकशी सूत्रे फिरवल्यानंतर खुशी हेच नाव माहिती पडले. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तिचा मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधायला सुरुवात केली. ती सापडल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. खुशी (१९) तिची मैत्रीण मैना दिलोद (३९) यांच्यासोबत ती अपहृत मुलगी दिसली. आरोपींनी तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्यासोबत चालण्यास सांगितले. ती मुलगी खुशी हिला ओळखत होती. या अल्पवयीन मुलीला या दिव्य कैलाश सिंग व पायल शहा या दोन महिलांना विकायचे होते. या महिलांना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. चारही महिलांना मंगळवारी कोर्टात सादर करण्यात येईल.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत