प्रतिकात्मक छायाचित्र
मुंबई

रेल्वे गार्डच्या डब्यात महिलेवर बलात्कार

वांद्रे टर्मिनस येथे उभ्या असलेल्या उधना एक्स्प्रेसच्या रिकाम्या गार्ड डब्यात ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना २ फेब्रुवारीच्या पहाटे घडली. तपास पथकाने आरोपीला अटक केली.

Swapnil S

मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे उभ्या असलेल्या उधना एक्स्प्रेसच्या रिकाम्या गार्ड डब्यात ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना २ फेब्रुवारीच्या पहाटे घडली. तपास पथकाने आरोपीला अटक केली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, २५ वर्षीय आरोपी हमालीचे काम करत होता. रेल्वे पोलिसांनी इतर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. पीडित महिला आणि तिचा जावई बांद्रा टर्मिनस येथे आरपीएफ कर्मचाऱ्यांकडे महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार पहाटे ४ वाजता दिली. पीडितेने सांगितले की, रिकाम्या उधना एक्स्प्रेसच्या गार्डच्या डब्यात तिच्यावर अत्याचार झाला. आरपीएफ व जीआरपीच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार