मुंबई

Worli hit and run case: मिहीर शहाची हायकोर्टात धाव, पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप

Worli BMW hit-and-run case: वरळी येथे बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाने हायकोर्टात धाव घेत पोलिसांच्या कारवाईला आक्षेप घेणारी याचिका दाखल केली आहे.

Swapnil S

Mihir Shah: मुंबई : वरळी येथे बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाने हायकोर्टात धाव घेत पोलिसांच्या कारवाईला आक्षेप घेणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर २१ ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मिहीरने ७ जुलैला दारूच्या नशेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू गाडी चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. मिहीरने गाडीखाली चिरडलेल्या कावेरी यांना निर्दयीपणे वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले होते. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला ९ जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून पोलिसांनी अटक केली. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या मिहीरच्या वतीने ॲड. नेहा पाटील यांनी जामीन अर्ज करण्यापूर्वी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल