मुंबई

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

मुंबईच्या लक्झरी भाडे बाजारात आणखी एक उच्च-मूल्याचा व्यवहार नोंदवला गेला आहे. 'आयव्हीएल धुनसेरी पेट्रोकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड'ने वरळीतील 'थ्री सिक्सस्टी वेस्ट'मधील ६,८३१ चौरस फुटांचे अपार्टमेंट दरमहा २८.५ लाख भाड्याने घेतले आहे.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत/मुंबई

मुंबईच्या लक्झरी भाडे बाजारात आणखी एक उच्च-मूल्याचा व्यवहार नोंदवला गेला आहे. 'आयव्हीएल धुनसेरी पेट्रोकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड'ने वरळीतील 'थ्री सिक्सस्टी वेस्ट'मधील ६,८३१ चौरस फुटांचे अपार्टमेंट दरमहा २८.५ लाख भाड्याने घेतले आहे. यामुळे हा व्यवहार सर्वोच्च मूल्याच्या निवासी भाडे करारांपैकी ठरला आहे.

'झॅपके'कडून मिळालेल्या व्यवहाराच्या आकडेवारीनुसार, हा लीव्ह अँड लायसन्स करार २८ सप्टेंबरला परवानाधारक (लायसी) असलेल्या आयव्हीएल धुनसेरी पेट्रोकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड व परवाना देणारी कंपनी डिराईव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स लि. यांच्यात नोंदवला गेला.

असा आहे भाडेकरार

वरळीच्या डॉ. एनी बेझंट रोडवरील 'थ्री सिक्सस्टी वेस्ट'च्या टॉवर बीमधील १९ व्या मजल्यावर ६,८३१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे अपार्टमेंट अपार्टमेंट ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्यात आले. दरमहा २८.५ लाखांचे सुरुवातीचे भाडे दुसऱ्या वर्षात वाढून २९.९२ लाख प्रतिमहिना आणि तिसऱ्या वर्षात ३१.४२ लाख प्रतिमहिना होईल. तीन वर्षांच्या कालावधीतील भाडे खर्च १०.७८ कोटी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

सोयाबीनच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची घट; शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग आर्थिक संकटात

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी