मुंबई

वरळी ते मरीन लाइन्स मार्गिका अंशतः खुली होणार; फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन, कोस्टल रोड प्रकल्पाचे ८४ टक्के काम फत्ते

Swapnil S

मुंबई : उद्यान, सायकल ट्रॅक, नाट्यगृह, जॉगिंग ट्रॅक अशा सोयीसुविधा कोस्टल रोड प्रकल्पात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोस्टल रोड प्रकल्पात मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर वरळी सी-फेस येथे लॅडस्कपिंग केले असून, येथून अथांग समुद्राचा आनंद लुटता येणार आहे.

कोस्टल रोडचे ८४.८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे थडानी जंक्शन वरळी ते मरीन लाइन्स दरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खुल्या करण्यात येणाऱ्या एका मार्गिकेचा शुभारंभ होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्पात एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे- वरळी सी- लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. चार मजली इमारतीची उंची असणार्‍या 'मावळा' टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात आले आहेत. सद्यस्थितीत ८४.८ टक्के काम फत्ते झाले असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थडानी जंक्शन वरळी ते मरीन लाइन्स दरम्यान, एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पात महालक्ष्मी मंदिराच्या मागून थेट कोस्टल रोडची सफर करता येणार आहे.

अथांग समुद्र न्याहाळता येणार!

कोस्टल रोड प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह इत्यादी समाविष्ट करण्यात आले आहे. सध्या समुद्र बाजूला असलेल्या फुटपाथवर बसण्यासाठी सिटींग व्यवस्था, टाईल्स बसवण्यात आल्या आहेत. वरळी सी फेस समुद्र दिशेला १०० परिसरात लॅडस्कॅपिंगच्या धर्तीवर फुटपाथचा कायापालट करण्यात आला आहे. समुद्र बाजूला बसून अथांग समुद्र न्याहाळता येणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पात समुद्र किनाऱ्या जवळील उपलब्ध जागेवर लॅडस्कॅपिंग करण्यात येणार आहे.

'असे' होतेय काम

पॅकेज चार - ९२.२४ टक्के काम पूर्ण

पॅकेज वन - ८५.४२ टक्के काम पूर्ण

पॅकेज दोन - ७१.१३ टक्के काम पूर्ण

उमेदवारच स्वत:च्या मतदानाला मुकले; उमेदवारी एका मतदारसंघात, मतदान दुसऱ्या मतदारसंघात

वादळी पावसाचा २२ केव्हीला फटका; मुंबईत 'या' ठिकाणी पाणीपुरवठा बंद

Mumbai Hoarding Collapse: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला

सुशील कुमार मोदी यांचे निधन

मुंबईतील बेकायदा होर्डिंग BMC च्या रडारवर; होर्डिंग्जची झाडाझडती घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश