मुंबई

जीवनसाथी डॉट कॉमवरून तरुणीची फसवणूक

प्रतिनिधी

मुंबई : जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख झालेल्या एका भामट्याने २६ वर्षांच्या तरुणीची सुमारे सात लाखांची फसवणूक केली. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून त्याने हा गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तरुणीच्या मित्राविरुद्ध बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. बोरिवलीत राहणाऱ्या तरुणीची लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर वैभव शाहशी ओळख झाली होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास काही महिन्यांत चांगला फायदा होईल, असे आमीष त्याने दाखवले होते. त्यामुळे तिने काही दिवसांपूर्वी सात लाख रुपये ट्रान्सफर केले होते. मात्र नंतर वैभव शाहने तिचा नंबर ब्लॉक केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात घेताच, तिने बोरिवली पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

१ नोव्हेबर ते ३ नोव्हेबर २०२३ या कालावधीत सुमारे सात लाख रुपये दिले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर केल्यांनतर वैभव शाहने तिचा फोन घेणे बंद केले होते. त्याने तिला ब्लॉक केले होते. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने वैभवकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच तिने बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी वैभव शाह या भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याच्या मोबाईलचे सीडीआर काढण्यात आले असून त्याला लवकरच या गुन्ह्यांत अटक केली जाईल. त्याने अशाच प्रकारे इतर काहींची फसवणुक केली आहे का याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त