प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

झोपेत चालताना इमारतीवरून पडून युवकाचा मृत्यू

झोपेत चालण्याची सवय असलेल्या मुस्तफा इब्राहिम छुनावाला (१९) या युवकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Swapnil S

मुंबई : झोपेत चालण्याची सवय असलेल्या मुस्तफा इब्राहिम छुनावाला (१९) या युवकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. माझगावच्या नेसबीट रोडवरील ॲॅक्वाजेम टॉवरमध्ये सकाळी ५ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. मुस्तफा इब्राहिम छुनावाला हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तत्काळ सैफी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. छुनावाला हा झोपेत चालण्याच्या विकाराने ग्रस्त होता.

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू