प्रातिनिधिक फ्रीपिक फोटो
मुंबई

रेडिओ क्लब येथे तरुणाचा बुडून मृत्यू 

कुलाब्याच्या रेडिओ क्लब येथे सोमवारी दुपारी एक तरुण समुद्रात बुडाला. त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून सेंट जाॅर्ज रुग्णालयात नेले; मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : कुलाब्याच्या रेडिओ क्लब येथे सोमवारी दुपारी एक तरुण समुद्रात बुडाला. त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून सेंट जाॅर्ज रुग्णालयात नेले; मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.  

सोमवारी दुपारी पावणेदोन  वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडून मृत्यू पावलेला तरुण हा अंदाजे २६ वर्षे वयाचा असून त्याची अद्याप ओळख  पटलेली नाही, असे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

घाटकोपरमध्ये तीन जखमी 

पालिकेच्या नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी घाटकोपर - पूर्वच्या गारोडिया नगर येथे हेमा या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी तेथील लाकडी बांबूची परांची कोसळून तीन जण जखमी झाले. दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमर अली शेख (४२), जोबीन शेख (३३) आणि रसीळ शेख (२२) अशी जखमींची नावे आहेत.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल