मुंबई

मुंबई युवक काँग्रेसला पहिली महिला अध्यक्ष मिळणार! तरुणांचा आवाज बनून काम करणार - झीनत शबरीन

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत झिनत शबरीन यांना सर्वाधिक १०,०७६ मते मिळाली आहेत. त्यामुळे मुंबई युवक काँग्रेसला पहिल्यांदा महिला अध्यक्ष मिळणार आहे. नवीन समिती सोबत काम करण्याची उत्सुकता होती आणि आता तरुणांचा आवाज बनून काम करुया, असा विश्वास झीनत शबरीन म्हणाल्या.

Swapnil S

मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत झिनत शबरीन यांना सर्वाधिक १०,०७६ मते मिळाली आहेत. त्यामुळे मुंबई युवक काँग्रेसला पहिल्यांदा महिला अध्यक्ष मिळणार आहे. नवीन समिती सोबत काम करण्याची उत्सुकता होती आणि आता तरुणांचा आवाज बनून काम करुया, असा विश्वास झीनत शबरीन म्हणाल्या.

राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेस मध्ये नियुक्त्या न करता निवडणुकीने पदाधिका-यांच्या नियुक्त्या होत असतात. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ९ उमेदवार मैदानात होते. मतदान १६ मे ते १७ जून दरम्यान झाले. याचे निकाल जाहीर झाले असून झीनत शबरीन सर्वाधिक १०,०७६ मते मिळाली आहेत. त्यांच्या रुपाने मुंबई युवक काँग्रेसला पहिली महिला अध्यक्ष मिळणार आहे.

उच्चशिक्षीत झीनत यांनी आपल्या शालेय जीवनातच प्राणी संरक्षण चळवळीत कार्य करण्यास सुरुवात केली. सामाजिक प्रश्नांवर अनेक आंदोलने केली त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये कार्यरत असतानाही त्यांनी युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून आंदोलने केली आहेत.

भारतीय युवा काँग्रेसने मला, एका कार्यकर्त्याच्या पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तीला, व्यासपीठ दिले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुंबई काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबईच्या युवा काँग्रेस कुटुंबाचे त्यांच्या मार्गदर्शन आणि विश्वासाबद्दल मनापासून आभार मानते. मुलाखतीची आणि नवीन समितीसोबत काम करण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. आम्ही मुंबईतील तरुणांचा आवाज बनून काम करू. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी राहुल गांधी व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिंब यांच्या नेतृत्त्वाखाली संघर्ष करत राहू, असे सर्वाधिक मते घेतल्यानंतर झीनत शबरीन म्हणाल्या.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन; फडणवीसांची टाळाटाळ; दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल - मुख्यमंत्री

राज्यसभेच्या ५ जागांसाठी २४ ऑक्टोबरला मतदान

जहाजबांधणी, सागरी उद्योगांसाठी ७० हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

रशियाची विमाने ‘नाटो’ हद्दीत घुसल्यास पाडा! डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचे ‘ई-साइन’ फिचर; राहुल गांधींच्या आरोपांनंतर घेतला निर्णय