राष्ट्रीय

जयशंकर यांच्यासहित ११ जण राज्यसभेत बिनविरोध निवडले जाणार

कोणत्याही पक्षाने उमेदवार न दिल्याने निवडणूक होणार नसल्याची शक्यता आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : राज्यसभेसाठी प. बंगालमधून सहा, गुजरातमधून तीन, गोव्यातून एका जागेसाठी २४ जुलैला मतदान नियोजित आहे, मात्र या जागांवर कोणत्याही पक्षाने उमेदवार न दिल्याने निवडणूक होणार नसल्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह ११ जणांची निवड बिनविरोध होणार आहे.

भाजपला एका जागेचा फायदा होणार असून, खासदारांची संख्या राज्यसभेत ९३ होईल. तरीही सरकारकडे बहुमत नाही. एस. जयशंकर, बाबुभाई देसाई, केसरीदेव सिंह हे गुजरात, तर अनंत महाराज प. बंगाल, सदानंद शेट तानावडे हे गोव्यातून भाजपचे उमेदवार आहेत. तर डेरेक ओब्रायन यांच्यासह सुखेंदु शेखर रॉय, डोला सेन, साकेत गोखले, समीरुल इस्लाम और प्रकाश बारिक हे तृणमूलचे उमेदवार आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री