अमेरिकेतून अजून ११२ भारतीय 'डिपोर्ट', अमृतसर विमानतळावर उतरली तिसरी बॅच संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

अमेरिकेतून अजून ११२ भारतीय 'डिपोर्ट', अमृतसर विमानतळावर उतरली तिसरी बॅच

अमेरिकेने अवैध मार्गाने स्थलांतर करून बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या आणखी ११२ भारतीयांना परत पाठवले आहे. परत पाठविलेल्या भारतीयांची ही तिसरी तुकडी आहे.

Kkhushi Niramish

अमेरिकेने अवैध मार्गाने स्थलांतर करून बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या आणखी ११२ भारतीयांना परत पाठवले आहे. परत पाठविलेल्या भारतीयांची ही तिसरी तुकडी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईअंतर्गत या अवैध स्थलांतरित भारतीयांना पुन्हा पाठवण्यात आले आहे. अवैध स्थलांतरितांची रविवारी तिसरी तुकडी घेऊन अमेरिकेचे विमान अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यामध्ये हरियाणातून सर्वात जास्त ४४ तर गुजरातचे ३३ जण आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकन वायूसेनेचे सी -१७ ग्लोबमास्टर विमान रविवारी रात्री १०.०३ वाजता अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. परत पाठवण्यात आलेल्या ११२ जणांमध्ये सर्वात जास्त ४४ हरियाणाचे त्यानंतर ३३ गुजरातचे, ३१ पंजाबचे, दोन उत्तर प्रदेशचे आणि प्रत्येकी एक हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचे आहेत. यामध्ये १९ महिलांचा समावेश असून १४ अल्पवयीन आहेत तर दोन लहान बालक आहेत.

अमृतसर विमानतळावर त्यांची पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणीसह सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर परत पाठवलेल्या या स्थलांतरितांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. त्यांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर काहींना घेण्यासाठी त्यांचे कुटुंब अमृतसर विमानतळावर पोहोचले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हरियाणा सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांसाठी पाठवली विशेष बस

हरियाणा सरकारने पहिल्या दोन वेळेप्रमाणे याही वेळी हरियाणातील लोकांना परत आणण्यासाठी अमृतसर विमानतळावर विशेष बस पाठवली आहे. रविवारी पोहोचलेल्या प्रवाशांमध्ये हरियाणाचे ४४ जण आहेत. हरियाणा सरकारने ५२ आसनी एसी बस पाठवली आहे. या बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचे बॅनर आहेत. या बॅनरवर 'मुख्यमंत्री तिर्थ यात्रा योजना, हरियाणा', असे लिहिले आहे.

Mumbai : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

Thane : दिव्याला मिळाला ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड; दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण

Mumbai : लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करणार; चौपाट्यांवर १२६ लाइफ गार्ड, अतिरिक्त आयुक्तांची स्थायी समितीत माहिती

ठाण्यातील सर्व मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा