राष्ट्रीय

कर्नाटकात अपघातात १२ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत टाटा सुमोतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे

नवशक्ती Web Desk

बंगळुरू : कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी चित्रावती ट्रॅफिक पोलीस ठाण्यासमोर घडली.

मृतांमध्ये ८ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर एक टँकर उभा होता. या टँकरला मागून येणाऱ्या टाटा सुमोने धडक दिली. जखमींना तत्काळ रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. दाट धुके असल्याने कारचालकाला रस्त्याच्या बाजूला असलेला टँकर दिसू शकला नाही. या दुर्घटनेत टाटा सुमोतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर चिक्कबल्लापूर जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस