राष्ट्रीय

लक्षद्वीपमध्ये पेट्रोल, डिझेल दरात १५ रुपये कपात

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आल्यानंतर आता लक्ष्यद्विपच्या सगळ्या बेटांवर पेट्रोल १००.७५ रुपये प्रति लीटर दराने मिळेल. तर एक लीटर डिझेलसाठी ९५.७१ रुपये मोजावे लागतील.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लक्षद्वीपमधील एंड्रोट आणि कल्पेनी बेटावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १५.३ रुपये प्रति लीटरने आणि मिनिकॉयमध्ये ५.२ रुपये प्रति लीटरने कपात केली. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आल्यानंतर आता लक्ष्यद्विपच्या सगळ्या बेटांवर पेट्रोल १००.७५ रुपये प्रति लीटर दराने मिळेल. तर एक लीटर डिझेलसाठी ९५.७१ रुपये मोजावे लागतील. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांची कपात केली होती. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे.

सोशल मीडिया एक्सवर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोल, डिझेल दरात करण्यात आलेल्या कपातीची माहिती दिली. लक्ष्यद्विपची चार बेटे कवरत्ती, मिनिकॉय, एंड्रोट आणि कल्पेनीला इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा केला जातो. कवरत्ती, मिनिकॉयमध्ये इंडियन ऑईलचे डेपो आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश