राष्ट्रीय

'सॉरी मम्मी-पप्पा...हाच शेवटचा पर्याय', परीक्षेच्या आदल्या दिवशी JEE च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

'मम्मी-पप्पा मी जेईई करू शकत नाही, म्हणून मी आत्महत्या केली, मी 'लूजर' आहे, मी सर्वात...

Swapnil S

राजस्थानच्या कोटा येथे विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण काही कमी होत नाहीये. सोमवारी येथे जेईईची तयारी करणाऱ्या अजून एका विद्यार्थिनीने जीवन संपवले. मंगळवारी तिची परीक्षा होती. त्याआधीच तिने टोकाचे पाऊल उचलले. अठरा वर्षीय विद्यार्थिनीने सोमवारी सकाळी बोरेखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरातच वेंटिलेशनच्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली.

निहारिका सिंग सोलंकी असे मृत मुलीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी, 'मम्मी-पप्पा मी जेईई करू शकत नाही, म्हणून मी आत्महत्या केली, मी 'लूजर' आहे, मी सर्वात वाईट मुलगी आहे, माफ करा मम्मी - पप्पा, हाच शेवटचा पर्याय आहे', अशी चिट्ठी तिने लिहिली होती. मृत तरुणी, निहारिका सिंग (18) ही बोरेखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिव विहार कॉलनीत त्यांच्याच घरात कुटुंबासोबत राहात होती आणि जेईईची तयारी करत होती, असे या क्षेत्राचे सर्कल ऑफिसर डीएसपी धर्मवीर सिंग यांनी सांगितले. ती 30-31 जानेवारी रोजी JEE परीक्षा देणार होती. तिने सोमवारी सकाळी उशिरा तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांनी सांगितले. तिच्या खोलीतून सापडलेल्या सुसाईड नोटवरून ती अभ्यासाच्या तणावाखाली होती आणि परीक्षेत यश मिळण्याबाबत साशंक होती, असे ते पुढे म्हणाले.

अभ्यासासाठी सुमारे 7-8 तास द्यायची

तीन बहिणींमध्ये निहारीका सर्वात मोठी होती. तिचे वडील कोटा येथील एका खासगी बँकेत 'गनमॅन' आहेत. हे कुटुंब मुळात झालावाड जिल्ह्यातील आकवडाखुर्द गावचे असून गेल्या तीन वर्षांपासून कोटा येथे राहत आहे. ती (निहारिका) 30-31 जानेवारी रोजी नियोजित JEE परीक्षेमुळे अभ्यासाच्या तणावाखाली होती. तथापि, ती अभ्यासात चांगली होती आणि अभ्यासासाठी सुमारे 7-8 तास द्यायची, असे मृत मुलीचा चुलत भाऊ विक्रम सिंग यांनी सांगितले. निहारिकाच्या आजीने सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण तिने दरवाजाना उघडला नाही. बराच वेळ दार न उघडल्याने आजीने आरडाओरडा करून इतर कुटुंबीयांना बोलावले. त्यानंदर दरवाजा तोडला असता निहारीका लटकलेल्या अवस्थेत आढळली. दरम्यान, कोटातील आठवडाभरातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. गेल्या वर्षी, 27 विद्यार्थ्यांनी येथे आत्महत्या केली होती.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?