राष्ट्रीय

काश्मीरमधील चकमकीत २ दहशतवादी ठार; सीआरपीएफचा एक जवान शहीद, सहा जखमी

Swapnil S

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील सीमेवरील गावात दडून बसलेल्या एका दहशतवाद्याला आणि त्याच्या साथीदाराला सुरक्षा दलांनी बुधवारी ठार केले. जवळपास १५ तास सुरू असलेल्या या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर सुरक्षा दलाचे अन्य सहा कर्मचारी जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कथुआ जिल्ह्याच्या सैदा सुखल गावात दोन दहशतवादी दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात केली. यावेळी झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारातून दोन अधिकारी सुदैवाने बचावले. दोडा जिल्ह्यात भदेरवाह-पठाणकोट मार्गावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जण आणि विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले. कटरा येथे अलीकडेच दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला होता, त्यानंतर बस दरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला तर ४१ जण जखमी झाले होते. कथुआ जिल्ह्याच्या सैदा सुखल गावात दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे जवान कबीर दास हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शस्त्रे व स्फोटकांचा साठा जप्त

ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला असून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था