राष्ट्रीय

८३ तेजस विमानांसाठी 'एचएएल'कडे ३६,४६८ कोटींची मागणी ;फेब्रुवारी २०२४ पासून विमाने हवाईदलाला मिळण्यास सुरुवात

भारताने हवाई दलातील जुनी रशियन बनावटीची मिग-२१ विमाने बदलण्यासाठी १९८०च्या दशकात तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता

नवशक्ती Web Desk

बंगळुरू : तेजस मार्क-१ या प्रकारच्या ८३ स्वदेशी लढाऊ विमानांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीकडे ३६,४६८ कोटी रुपयांची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी पहिले विमान फेब्रुवारी २०२४ मध्ये हवाईदलाला मिळणे अपेक्षित आहे.

भारताने हवाई दलातील जुनी रशियन बनावटीची मिग-२१ विमाने बदलण्यासाठी १९८०च्या दशकात तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता. तो आता बराचसा फलद्रुप होत आहे. तेजसची मार्क-१ ही आवृत्ती २०१६ साली हवाईदलात दाखल झाली. सध्या हवाईदलात तेजसच्या दोन स्कॉड्रन कार्यरत आहेत. या विमानांत आणखी सुधारणा करून तेजस मार्क-२ ही आवृत्ती विकसित केली जात आहे. त्यासाठी सरकारने ९००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तेजस मार्क-२ प्रकारच्या विमानांसाठी इंजिनांच्या निर्मितीचा करार नुकताच अमेरिकेच्या 'जीई' या कंपनीबरोबर करण्यात आला आहे. त्यासह या इंजिनांच्या निर्मितेचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करण्यासाठी मोदींच्या जून २०२३ च्या अमेरिका भेटीत प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर या विमानाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत