राष्ट्रीय

CM केजरीवालांसाठी तिहार जेलमध्ये मेडिकल बोर्ड, AIIMS चे ५ डॉक्टर करणार हेल्थ चेकअप

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले. या पत्रात केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम झाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी पत्रातून केला.

Swapnil S

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी एम्सच्या ५ डॉक्टरांची टीम तयार करण्याचे आदेश न्यायालयाने २३ एप्रिल रोजी दिले होते. यानुसार, ५ डॉक्टरांची टीम तयार केली असून डॉ. निखिल टंडन हे डॉक्टरांच्या टीमचे प्रमुख आहेत. निखिल टंडन हे तेच डॉक्टर आहेत, ज्यांना तिहार तुरुंगाच्या डीजींच्या पत्रावरून केजरीवाल यांच्या हेल्थ चेकअपसाठी एम्सने आधीच नियुक्त केले होते

केजरीवाल यांना सोमवारपासून (२२ एप्रिल) दुपारी जेवण्यापूर्वी २ युनिट इन्सुलिनचे डोस आणि रात्रीच्या जेवणापूर्वी २ युनिट इन्सुलिनचे डोस दिले जात आहेत. आता लवकरच मेडिकल बोर्डाच्या ५ डॉक्टरांची टीम तिहार तुरुंगात जाऊन केजरीवाल यांची तपासणी करू शकते.

तिहार तुरुंगातील डॉक्टर केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी दररोज तपासत असून निरीक्षण करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, केजरीवाल यांना फक्त घरचे जेवण दिले जात आहे. सध्या केजरीवाल यांची प्रकृती स्थिर आहे.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी (२५ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले. या पत्रात केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम झाले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी पत्रातून केला होता.

संजय सिंह यांचे गंभीर आरोप -

संजय सिंह यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) हे चोवीस तास केजरीवाल यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांकडून त्यांना मिळाली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांची हेरगिरी केली जात असून त्यांना २३ दिवसांपासून इन्सुलिन देण्यात आले नव्हते, असेही त्यांनी पत्रात लिहिले होते. दिल्लीच्या जनतेची सेवा करणे हा केजरीवाल यांचा गुन्हा आहे का? की त्यांच्याशी वैयक्तिक वैर आहे का? जीव घेऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवायचे कारस्थान आहे का? हे सर्व पंतप्रधान कार्यालय आणि एलजीच्या देखरेखीखाली सुरू आहे, याचे मला दुःख वाटत आहे, असे संजय सिंह यांनी पत्रात म्हटले होते.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद