राष्ट्रीय

चारधाम यात्रेसाठी ५ लाख भाविकांची नोंदणी; 'या' दिवशी मंदिरे उघडणार

चारधाम यात्रा सुरू होण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारने जोरदार तयारीही सुरू केली आहे.

Swapnil S

डेहराडून : चारधाम यात्रा सुरू होण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या यात्रेसाठी उत्तराखंड सरकारने जोरदार तयारीही सुरू केली आहे. चारधाम व हेमकुंड साहिब यात्रेसाठी आतापर्यंत ५ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.

उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेने सांगितले की, यमुनोत्रीसाठी ९३,८०३, गंगोत्रीसाठी ९६,४४५, केदारनाथसाठी १ लाख ६६ हजार ५७६, तर बद्रीनाथसाठी १ लाख ५५ हजार ४६ जणांनी नोंदणी केली, तर हेमकुंड साहिबसाठी ५१५१ भाविकांनी नोंदणी केली. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सरकारला मोठ्या प्रमाणावर नियोजन करावे लागणार आहे, तर खासगी गाडीतून येणाऱ्या भाविकांची संख्या ५,८०२ झाली आहे.

चारधाम यात्रेच्या मार्गावर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रस्ते, आरोग्य, वीज, पाणी आदींची व्यवस्था केली जात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चारधाम यात्रेबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली व सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

या यात्रेसाठी नोंदणी सक्तीची

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेसाठी धामी सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी सक्तीची केली आहे. registrationandtouristcare.uk.gov.in येथे जाऊन भाविक नोंदणी करू शकतात.

या दिवशी मंदिरे उघडणार

केदारनाथ धाम २ मे, बद्रीनाथ धाम ४ मे, गंगोत्री आणि यमुनोत्री ३० एप्रिल, तर श्री हेमकुंड साहिब २५ मे रोजी उघडणार आहे.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

बिहार काँग्रेसच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना शिवीगाळ; राहुल यांनी माफी मागण्याची भाजपची मागणी

बिहारमध्ये जदयू १०२, भाजप १०१ जागा लढणार