राष्ट्रीय

अमेरिकेतून पैसे पाठवताना ५ टक्के कर लागणार; अमेरिकन संसदेत विधेयक सादर

अमेरिकेत राहून परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना आता मोठा धक्का बसणार आहे. कारण अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अमेरिकेतून विविध देशांमध्ये पैसे पाठवताना ५ टक्के कर लावण्याचे ठरवले आहे. याचा मोठा फटका भारतीयांना बसणार आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहून परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना आता मोठा धक्का बसणार आहे. कारण अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अमेरिकेतून विविध देशांमध्ये पैसे पाठवताना ५ टक्के कर लावण्याचे ठरवले आहे. याचा मोठा फटका भारतीयांना बसणार आहे.

अमेरिकेच्या संसदेत ‘द वन बिग ब्युटीफूल बिल’ नावाचे विधेयक सादर झाले. या विधेयकामुळे अमेरिकेतून जगभरात पैसे पाठवणे महाग होणार आहे. कारण या विधेयकानुसार, तुम्ही जर अमेरिकेचे नागरिक नसाल व परदेशात पैसे पाठवत असल्यास तुमच्या रकमेवर थेट ५ टक्के कर अमेरिकन सरकार कापणार आहे.

अमेरिकन संसदेत सादर झालेले नवीन विधेयक ३८९ पानांचे आहे. त्यातील ३२७ क्रमांकाच्या पानावर एक ओळ लिहिली आहे. यात म्हटलेय की, अमेरिकेच्या बाहेर पैसे पाठवणाऱ्यांना ५ टक्के कर लागणार आहे.

हे विधेयक ट्रम्प यांनी का आणले?

रिपब्लिकन नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे अमेरिकेला ३.९ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजचा खर्च काढण्यास मदत मिळेल. ट्रम्प यांच्या काळात कर कपातीची योजना येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन ४ जुलै आहे. तोपर्यंत यावर कायदा बनवण्याचे प्रयत्न केले जातील.

भारताला मोठा फटका
अमेरिकेत ४५ लाख भारतीय राहतात. त्यातील बहुतांशी ‘एच-१बी’ किंवा ‘एल-१’ व्हिसावर आहेत. हे लोक दर महिन्याला घरी पैसे पाठवतात. आई-वडिलांना औषधासाठी, बहिणीच्या शिक्षणासाठी, कोणाच्या लग्नासाठी पैसे पाठवतात. या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे. कारण भारतीय लोक अमेरिकेतून भारतात मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवत असतात. ‘आरबीआय’च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतून भारतात २०२३-२४ रोजी ११८.७ अब्ज डॉलर पाठवण्यात आले. हा नवीन कर अंमलात आल्यास अमेरिकेला यातून १.६५ अब्ज डॉलर कर रूपाने मिळणार आहेत.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे