राष्ट्रीय

नेपाळमध्ये ६.१ रिश्टर क्षमतेचा भूकंप - २० घरांचे नुकसान

नॅशनल अर्थक्वेक मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरनुसार धाडिंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता

नवशक्ती Web Desk

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडू येथे रविवारी ६.१ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यात २० घरांचे नुकसान झाले, लोकांमध्ये घबराट पसरली.

नॅशनल अर्थक्वेक मॉनिटरिंग अँड रिसर्च सेंटरनुसार धाडिंग जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी हा भूकंप नोंदवला गेला. बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जिल्ह्याच्या विविध भागात भूस्खलन झाले. भूकंपामुळे वीस घरांचे नुकसान झाले आहे आणि धाडिंगच्याकुमलतारी येथे आणखी ७५ घरांना भेगा पडल्या आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री