एक्स
राष्ट्रीय

गुजरातमध्ये ७०० किलो अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात ३ हजार कोटी दर

अमली पदार्थविरोधी संस्थेने गुजरातच्या समुद्रात ७०० किलो अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३ हजार कोटी रुपये आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अमली पदार्थविरोधी संस्थेने गुजरातच्या समुद्रात ७०० किलो अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३ हजार कोटी रुपये आहे.

अमली पदार्थविरोधी संस्थेच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोरबंदरच्या समुद्रात ‘मेथाफेटामाईन’ हे कृत्रिम अमली पदार्थ पकडण्यात आले. याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर २५०० ते ३ हजार कोटी रुपये आहे. याप्रकरणी ८ परदेशी नागरिकांना पकडले आहे. एनसीबी, नौदल, गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ही मोहीम हाती घेतली.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या खबरीनंतर ‘सागर मंथन-४’ ही मोहीम एनसीबीने हाती घेतली. भारताच्या समुद्रात अमली पदार्थांचा साठा असलेली बोट घुसल्याची माहिती मिळाली. या बोटीचा नौदलाच्या बोटींनी माग काढायला सुरुवात केली. त्यानंतर ही बोट पकडली. तिच्यावर मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडले. यावेळी आठ परदेशी नागरिकांना पकडले. ते इराणी असल्याचा दावा करत आहेत. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, असे एनसीबीने सांगितले.

नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एनसीबी व गुजरात पोलिसांच्या समन्वयाने संशयास्पद बोटीला पकडून तिच्यातून अमली पदार्थांचा साठा पकडला. यंदाच्या वर्षात नौदलाने दुसऱ्यांदा मोठा अमली पदार्थांचा साठा पकडला आहे. अटक परदेशी नागरिकांना तुरुंगात डांबले असून त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी