नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी भारतात ७६१ नवीन कोविड १९ची प्रकरणे आणि विषाणूजन्य आजारामुळे १२ मृत्यूची नोंद झाली. देशातील सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या गुरुवारी ४४२३ वरून ४३३४ वर आली आहे.
केरळमध्ये सर्वाधिक १२४९ सक्रिय प्रकरणे आहेत, त्यानंतर कर्नाटकात १२४०, महाराष्ट्र ९१४, तामिळनाडू १९० आणि छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश प्रत्येकी १२८ आहेत.तर १२ ताज्या मृत्यूंपैकी पाच केरळमधील, चार कर्नाटकातील, दोन महाराष्ट्रातील आणि एक उत्तर प्रदेशमधील नोंदवले गेले आहेत.
४ जानेवारीपर्यंत १२ राज्यांमधून कोविड-१९ सब-व्हेरिएंट जेएल-१ च्या प्रकरणांची संख्या ६१९ वर पोहोचल्याचे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. या आकडेवारीनुसार कर्नाटकात १९९, केरळमधून १४८, महाराष्ट्रात ११०, गोव्यातून ४७, गुजरातमधून ३६, आंध्र प्रदेशातून ३०, तामिळनाडूमधून २६, दिल्लीतून १५, राजस्थानमधून ४, तेलंगणामधून २ आणि ओदिशा आणि हरयाणात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
जरी प्रकरणांची संख्या वाढत आहे आणि जेएन-१ चे उप-प्रकार देशात आढळून आले असले तरी, चिंतेचे कारण नाही, कारण बहुतेक संक्रमित लोक घरगुती उपचारांचा पर्याय निवडत आहेत, हे सौम्य आजाराचे संकेत आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.