राष्ट्रीय

विनाकारण रेल्वेची साखळी ओढल्यास मिनिटाला ८ हजार दंड; रेल्वेच्या भोपाळ विभागाची घोषणा

विनाकारण साखळी ओढून रेल्वे गाड्यांना विलंब करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात भोपाळ रेल्वे विभागाने कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. ठोस कारणाशिवाय रेल्वे साखळी ओढल्यास प्रवाशांना मिनिटाला ८ हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

Swapnil S

भोपाळ : विनाकारण साखळी ओढून रेल्वे गाड्यांना विलंब करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात भोपाळ रेल्वे विभागाने कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. ठोस कारणाशिवाय रेल्वे साखळी ओढल्यास प्रवाशांना मिनिटाला ८ हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

अवैधरीत्या साखळी ओढल्याने गाड्यांना विलंब होतो तसेच आर्थिक फटका बसतो. त्यामुळे आरपीएफने ६ डिसेंबरपासून नवीन मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, विनाकारण साखळी ओढल्यास ५०० रुपये दंड अधिक प्रति मिनिट ८ हजार रुपये असा दंड ठोठावला जाईल. साखळी ओढल्यानंतर ५ ते ७ मिनिटे गाडी थांबते. त्यामुळे ५०० रुपये अधिक ५ मिनिटे गुणिले ८ हजार म्हणजे एकूण ४०,५०० रुपये दंड प्रवाशांना भरावा लागेल. गाडी जितका वेळ थांबेल, तितका दंड वाढत जाणार आहे. हा दंड एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य