राष्ट्रीय

अयोध्येतील श्रीराम मंदिरात बसणार सोन्याचा दरवाजा ; लोकापर्ण जवळ येत असल्याने कामाला वेग

नवशक्ती Web Desk

अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचा लोकर्पण सोहळा जवळ येत आहे. यामुळे मंदिराच्या कामाला देखील वेग आला आहे. मंदिर समिती मंदिराच्या बांधकामात सर्वकाही भव्य दिव्य करत आहे. तर भक्तांकडून देखील आपापल्या परिने योगदान दिलं जात आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका कुलूप बनवणाऱ्या व्यक्तीने राम मंदिरासाठी जगातील सर्वात मोठ कुलूप बनवल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. आता अयोध्येतील राम मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यापैकी गर्भाग्रहातील दरवाजा हा सोन्याचा असणार आहे.

काही दिवासांपूर्वी महाराष्ट्रातील चंद्रापर जिल्ह्यातील राम मंदिरासाठी सागवान लाकूड पाढवण्यात आलं होतं. याच लाकडाचे हे ४२ दरवाजे बनवण्यात येणार आहेत. मात्र, मंदिरातील गर्भाग्रहातील दरवाजा हा सोन्याचा बसवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिली. तर इतर दरवाजांवर सुंदर कोरिव व नक्षीकाम केले जाणार आहे. त्यात मोर, कलश, चक्र आणि फुलांचं नक्षीकाम होणार आहे.

मंदिराच्या गर्भाग्रहाला मात्र वेगळीच चमक असणार आहे. येथील भिंतीं आणि फरशींवर मकरानाचे पांढरे मार्बल असणार आहे. ज्यात इनले कलाकारी असणार आहे. याठिकाणी प्रभू रामाच्या बालपनातील २ लहान मूर्ती असणार आहे. त्यातील एक चल तर दुसरी अचल असणार आहे. तसंच अयोध्येतील या भव्य मंदिरात तीन मूर्ती बसवण्यात येणार असून त्यातील एक मूर्ती गर्भग्रहात विराजमान होणार आहे.

या भव्य मंदिरात सोन्याच्या दरवाजासह राजस्थानमधून आणलेलं पहाडपूरचं सँडस्टोन, नकराना मार्वल, तेलंगणाचं ग्रेनाईट, महाराष्ट्रातील लाकूड इत्यादीचा वापर करण्यात येत आहे. तर चंदीगट येथील खास वीट मंदिरात बसवण्यासाठी बनवण्यात येणार आहे.

जनमताचा आरसा इंडियाच्या बाजूने

सत्ता गेल्यावर मागे राहिल, कटकारस्थानांची कुरुपता

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"वाटेल त्याच्या डोक्यात जिरेटोप घालू नका..." उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं