PM
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

आयईडी स्फोट घडवून आणला. यात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आणि दुसरा एक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवशक्ती Web Desk

नारायणपूर : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात बुधवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केला. आयईडी स्फोट घडवून आणला. यात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आणि दुसरा एक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

लहाने डोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमदाई घाटी लोहखनिज खाण परिसरात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा सुरक्षा दलाचे जवान कारवाईसाठी बाहेर पडले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. नक्षलवाद्यांनी यावेळी आयईडी स्फोट घडवून आणला आणि गस्ती पथकावर गोळीबार केला, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झाली. त्यात सीएएफच्या नवव्या बटालियनशी संबंधित कॉन्स्टेबल कमलेश साहू शहीद झाले, तर दुसरे कॉन्स्टेबल विनय कुमार साहू जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी