राष्ट्रीय

अजित पवार विमान अपघात : ब्लॅकबॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी भारत घेणार अमेरिकेची मदत

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात चौकशीला आता वेगळे वळण लागले आहे. विमान अपघात चौकशी संस्था ‘एएआयबी’ने मंगळवारी सांगितले की, लिअरजेट ४५ विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) मधून डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेकडे विशेष मदत मागितली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात चौकशीला आता वेगळे वळण लागले आहे. विमान अपघात चौकशी संस्था ‘एएआयबी’ने मंगळवारी सांगितले की, लिअरजेट ४५ विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) मधून डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेकडे विशेष मदत मागितली आहे.

‘एएआयबी’ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर (ब्लॅकबॉक्स) दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले होते. ‘एएआयबी’नुसार, ‘एल-३-कम्युनिकेशन्स’द्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) त्यांच्या फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. लिअरजेट ४५ विमान अपघाताची सविस्तर आणि व्यापक चौकशी सुरू आहे. ही चौकशी विमान (अपघात आणि घटनांची चौकशी) नियम, २०१७ अंतर्गत निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांच्यानुसार केली जात आहे.

‘हनीवेल’द्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हआर) ची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे. डेटा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीच्या मदतीची गरज लागणार आहे. यासंदर्भातील मान्यताप्राप्त प्रतिनिधीकडून मदत मागितली गेली आहे, असे चौकशी एजन्सीने म्हटले आहे. या प्रकरणात, ही यंत्रे उत्पादन करणारी कंपनी अमेरिकेतील आहे, त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे.

...मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा? - मिटकरी

विमानाची टेल (शेपटी) पूर्णपणे सुस्थितीत असल्याने ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. विमानाचे शेपूट सुस्थितीत आहे मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स शेपटीमध्ये असतो, विमानाचा अपघात होतो तेव्हा शेपटी पूर्णपणे जळत नाही त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स शेपटीमध्ये ठेवला जातो. अपघातग्रस्त विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत आहे, ती अजिबात जळालेली नाही, त्यामुळे ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध नाही, असे मिटकरी यांचे म्हणणे आहे.

राज्यसभेसाठी १६ मार्चला निवडणूक; राज्यातील सात जागांचा समावेश; महाविकास आघाडीची कसोटी लागणार

वैमानिकाच्या मदतीने अजित पवारांचा घातपात! रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

राहुल गांधी देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक - रिजिजू

विजय मल्ल्याची नवीन चाल! भारतात कधी परतणार हे निश्चित सांगू शकत नाही; उच्च न्यायालयात नकारघंटा

Mumbai : प्रभाकर शिंदेंना वाढदिवसाची भेट; स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध, शिक्षण समितीवर राजेश्री शिरवाडकर